गॉसिपसिने ब्रेकिंग

पोरींना झिंगाट करणारा डीजे अक्षय गेला कसा?

अक्षय हा ओडिशातील सर्वात लोकप्रिय डीजे अक्षय कुमार, ज्याला डीजे अझेक्स म्हणून ओळखले जाते. तो ओडिशातील सर्वोत्तम डीजेपैकी एक होता. गेली 9 वर्षे ते या क्षेत्रात काम करत होता. प्रेक्षकांमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती, तर सोशल मीडियावरही त्याचे 94 हजार फॉलोअर्स आहेत.

द थिंक इंडिया ब्युरो

देशातील लोकप्रिय डीजे अझेक्स (DJ Azex) उर्फ अक्षय कुमार याचा मृतदेह त्याच्या भुवनेश्वर येथील घरी आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, याचवेळी अक्षयच्या प्रेयसीने त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रेयसी अनेक दिवस अक्षयला काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अक्षयचा मृतदेह भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला, जिथे त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सध्या पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला नाही. शहरातील खारवेल नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अक्षय हा ओडिशातील सर्वात लोकप्रिय डीजे अक्षय कुमार, ज्याला डीजे अझेक्स म्हणून ओळखले जाते. तो ओडिशातील सर्वोत्तम डीजेपैकी एक होता. गेली 9 वर्षे ते या क्षेत्रात काम करत होता. प्रेक्षकांमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती, तर सोशल मीडियावरही त्याचे 94 हजार फॉलोअर्स आहेत.

घरात अंधार होता

ओडिशातील एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, शनिवारी रात्री वादळानंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. घरात अंधार होता आणि अक्षय त्याच्या खोलीत होता. रात्री दहाच्या सुमारास कुटुंबीयांनी अक्षयला फोन केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशयास्पद स्थिती दिसल्यावर कुटुंबीयांनी त्याच्या खोलीचे कुलूप तोडले असता तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

काकांचा दावा- गर्लफ्रेंड ब्लॅकमेल करत होती

एका न्यूज पोर्टलशी केलेल्या संभाषणात अक्षयच्या काकांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून तो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ती मुलगी त्याला ब्लॅकमेल करत होती. अक्षयच्या मृत्यूला मुलगी आणि तिचा मित्र जबाबदार असल्याचं काका भोलानाथ मोहराणा सांगतात.

सर्वात लोकप्रिय डीजे

अक्षय हा ओडिशातील सर्वात लोकप्रिय डीजे अक्षय कुमार, ज्याला डीजे अझेक्स म्हणून ओळखले जाते. तो ओडिशातील सर्वोत्तम डीजेपैकी एक होता. गेली 9 वर्षे ते या क्षेत्रात काम करत होता. प्रेक्षकांमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती, तर सोशल मीडियावरही त्याचे 94 हजार फॉलोअर्स आहेत.

प्रेयसी फोटो दाखवून अक्षयकडे करायची पैशांची मागणी

एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयची मैत्रीण त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. तिच्याकडे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ होते ज्याद्वारे ती ब्लॅकमेल करत असे. ती त्याचा मानसिक छळ करत होती. अक्षयच्या कुटुंबीयांनी सविस्तर चौकशीची मागणी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close